महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) 31 मार्चपूर्वी घेण्यात येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) 31 मार्चपूर्वी घेण्यात येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. 
मुख्य बातम्या मोबाईल

31 मार्चपर्यंतच्या MPSC परीक्षा रद्द - आदित्य ठाकरे

सरकारनामा ब्युरो

पुणे - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) 31 मार्चपूर्वी घेण्यात येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. 

याबाबत त्यांनी ट्विट करीत म्हटले आहे, की राज्य सरकारने 1897 च्या साथरोग प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यामुळे एमपीएससीमार्फत 31 मार्च किंवा पुढील आदेश होईपर्यंत होणाऱ्या सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मुंबई येथील कस्तुरबा गांधी रुग्णालयाला भेट देऊन कोरोनोचा आढावा घेतला. कोरोना व्हायरसचे नऊ रुग्ण कस्तुरबा गांधी रुग्णालयात दाखल आहेत तर संशयित रूग्ण पासणीसाठी या रुग्णालयात येत आहेत. दरम्यान याचा आढावा आज मंत्री टोपे यांनी घेतला. कस्तुरबा रुग्णालयातील उपचाराबाबत अनेक तक्रारी ही काही नागरिकांनी केल्या होत्या. त्यानंतर प्रत्यक्ष रुग्णांची काळजी रुग्णालय प्रशासन कशी घेतेय याची पाहणी राजेश टोपे यांनी केली.

कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या मुंबईत वाढत चालली आहे. या रुग्णांवर कस्तुरबा गांधी या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याच रुग्णालयाच्या अगदी समोर ऑर्थर रोड कारागृह आहे. या कारागृहात आठशे कैद्यांची क्षमता असताना जवळपास साडेतीन हजार कैदी ठेवण्यात आलेले आहेत. त्यामुळे या कैयद्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये. यासाठी जवळपास साडेतीनशे कैद्यांना तळोजा आणि इतर कारागृहात हलवलं जाणार आहे. 

कोरोनामुळे राज्यातील शाळांना सुटी जाहीर करण्यात आली असून सार्वजनिक कार्यक्रमही रद्द करण्यात आले आहेत. राजकीय नेत्यांच्या सभा, संमेलने आणि बैठकाही रद्द करण्यात आल्या आहेत.

कोरोनाच्या साथीमुळे मुंबईकर धास्तावले आहेत. देशाच्या आंतरराष्ट्रीय सीमाही बंद करण्यात आल्या आहेत. भारतानेही आपत्ती जाहीर केली असून एकट्या महाराष्ट्रात 32 रग्ण आढळले आहेत. कोरोनामुळे मॉल्स, चित्रपटगृहेही बंद ठेवण्यात आली आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT